भाजपा ज्येष्ठ नेते तथा खासदार गिरीश बापट यांच आज निधन झालं आहे. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ
मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रदीर्घ आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलं जाणार असल्याची माहिती, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे.