उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केल्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, मोदीजी किंवा अमित शाह यांच्यावर पुन्हा व्यक्तीगत टीका खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. नागपूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.