कसब्यात पैसे वाटपाच्या आरोपावरून Chandrashekhar Bawankule यांची प्रतिक्रिया
कसब्यात पोटनिडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटण्यात आले, असा आरोप मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर केला आहे.
धंगेकर यांनी याविरोधात उपोषण देखील केलं होतं. मात्र ही सगळी स्टंटबाजी आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच भाजपाने कोणताही चुकीचा प्रकार केला नाही, पैसे वाटले नाही, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.