क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्यावतीने महामिसळ बनवण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही पाच हजार किलोची मिसळ बनवली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून मिसळ बनविण्याची तयारी सुरुवात झाली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरिता आलेल्या सर्व नागरिकांना ही मिसळ वाटप केली जात आहे.