भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दापोडीत सलग १८ तास अभ्यास करण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज (गुरुवारी) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.