Aaditya Thackeray: "कांजूरमार्गची 'ती' जागा कुणाची?", आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल!
शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी मेट्रो ६ प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या जागेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. कांजूमार्ग येथील ४४ हेक्टरमधील १५ हेक्टर जागा मेट्रो ६ प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. मग, उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी ठेवली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते #eknathshinde #devendrafadnavis #adityathackeray #udhavthakkarey