गणेशोत्सव काळात लोणेरे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला, वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न

ETVBHARAT 2025-08-13

Views 10

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आणि विशेषत: कोकणवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. दीर्घकाळ रखडलेल्या लोणेरे येथील उड्डाणपुलाचं काम अखेर अंतिम टप्प्यात आलं असून, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. माणगाव आणि महाडच्या दरम्यान असलेल्या या पुलाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होतं. यामुळं लोणेरे परिसरात दररोज मोठी वाहतूक कोंडी होत होती. विशेषत: सुट्ट्यांच्या दिवशी आणि सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी अधिक ठप्प होत होती. गणेशोत्सव काळात मुंबई–गोवा महामार्गावर लाखो भाविक कोकणाकडे प्रवास करतात. त्यामुळं या ठिकाणी होणारी कोंडी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असते. दरम्यान, वाहतूक कोंडीची ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) पुलाचे काम वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक टप्प्यात पुलाची एक बाजू तात्पुरती वाहतुकीसाठी खुली केली जाणार असून, उर्वरित काम सणानंतर पूर्ण केले जाणार आहे. याचबरोबर, स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, "हा पूल खुला केल्यामुळं गणेशोत्सव काळात कोकणाकडे प्रवास अधिक सुरळीत होईल," असं मत व्यक्त केलं आहे. तसंच प्रशासनाकडून मात्र प्रवाशांना वेगमर्यादा पाळण्याचं आणि सुरक्षितपणे प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS