अजित पवारांचा मृत्यू झालेल्या अपघातात संपूर्ण विमान जळून खाक, बारामतीमधून अपघातस्थळावरून पाहा ग्राऊंड रिपोर्ट

ETVBHARAT 2026-01-28

Views 7

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीत लँडिंग करताना अपघात झाला आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे.  देशभरातून विविध राजकीय नेते तसेच कार्यकर्त्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे सर्वच मंत्री आणि दिग्गज नेतेमंडळी अंत्यसंस्कारला उपस्थित असणार आहेत. या अपघातात संपूर्ण विमान हे जळून खाक झालं आहे. ज्या ठिकाणी अपघात घडला आहे, त्या ठिकाणी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून संपूर्ण घटनास्थळाची तपासणी केली जात आहे.  बारामती विमानतळावरून अवघ्या तीन किलोमीटर परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात संपूर्ण विमान हे जळून खाक झालं आहे. या घटनास्थळावरून ईटीव्ही प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी घेतलेला आढावा पाहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS