वाडा आणि पुणे यांचे जुने नाते आहे. पुण्यातल्या वाड्यांना एक वेगळेच स्थान आहे. अश्याच एका पुणेकर काकांनी पुण्यातील आपल्या वाड्याची एक सुंदर प्रतिकृती तयार केलीय. आणि ही फक्त एक प्रतिकृती नसून .. हा दिवाळीचा अनोखा कंदील त्यांनी बनवलाय ..
पुण्यातील कसबा पेठेत रजनीकांत वेर्णेकर राहतात.. अतिशय कलात्मक..आणि अतिशय आकर्षक अशी ही वाड्याची प्रतिकृती तयार करायला रजनीकांत यांना १५० दिवसांचा कालावधी लागला आहे. वड्यातले घरातील दिवे टीव्ही टेबल खुर्ची अंगणातील रांगोळी, मुंजोबाचे मंदिर आसे बारकावे अगदी खुबीने त्यांनी मांडले आहेत. त्यांच्या या कामा बद्दल आपण आज त्यांच्याकडूनच माहिती घेऊया..