सध्या शेतकऱ्यांसंबंधी लागू केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, 'या कायदा काहीही झालं तरी रद्द केला जाणार नाही, पण या कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील', असं स्पष्टीकरण दिलं.