Chandrakant Patil: 'भाजपा अनेक महिन्यापासून...'; बावनकुळेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

Lok Satta 2023-03-19

Views 1

Chandrakant Patil: 'भाजपा अनेक महिन्यापासून...'; बावनकुळेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

भाजपा अनेक महिन्यापासून निवडणुकीची तयारी करत आहे. विधानसभा आणि लोकसभेची तयारी सुरू आहे. शिवसनेच्या वाट्याला ज्या जागा जातील हे आत्तापासून ठरवण्याचे काही कारण नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल असे विधान पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. संपाबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. परंतु, परीक्षार्थी आणि रुग्णांना वेठीस धरणे चुकीचे आहे. अत्यावश्यक सेवामधील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करावं आणि बाकी कर्मचाऱ्यांनी संप करावा असा देखील ते त्यांनी म्हटलं आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पिंपरी- चिंचवड शहरातील विविध विकास कामांची उदघाटने करण्यात आली.

रिपोर्टर: कृष्णा पांचाळ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS