नांदेड : भारत हा विविध संस्कृती असलेला सर्वोच्च असा देश आहे. देशाचा विकासही झाला आहे. परंतु महाराष्ट्राच्या बरोबरीने क्षेत्रफळ असलेला जर्मनी देशाचे एकुण उत्पन्न भारता येवढे आहे. म्हणूनच भारताची जर्मनी व्हावी यासाठी सर्वांच्या प्रयत्नाची गरज असून, शिक्षण आणि आरोग्याचा नांदेड ग्लोबल पॅटर्न देशभर विकसीत व्हावा, असे मत जर्मनीस्थित भारतीय विदेश सेवाधिकारी (राजदूत) डॉ. सुयश चव्हाण यांनी व्यक्त केले. सकाळ नांदेड आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनी कोरोना योद्ध्यांच्या गौरवप्रसंगी ते सोमवारी (एक मार्च) बोलत होते.
(व्हिडिओ - मुनवर खान, नांदेड)