पर्वती दर्शन मधील पंचशील चौकातील चाळ 97,98 मध्ये चक्क उन्हाळ्यात व पावसाळ्यात ही घरात पाणी शिरते आहे.यामुळे येथील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागास वारंवार तक्रार करून सुध्दा यावर तात्पुरती मलमपट्टी केली जात आहेत. यामुळे येथील जुन्या सांडपाणी लाईन काढून त्याठिकाणी मोठ्या व्यासाच्या लाईन टाकून येथील प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
#pune #sakalmedia #mncpune