नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाने आज जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात नागपूर विभागाचा निकाल 93.84 टक्के लागला आहे. विभागात गोंदिया जिल्ह्याने 95.22 टक्क्यांसह विभागातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलीच आघाडीवर आहेत.
नागपूर : ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याला अनेकांनी विरोध दर्शविला असून न्यायालयात आव्हानही देण्यात आले. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून सरकारने तशी अधिसूचनाच काढली आहे. प्रशासक सरकारच्या मर्जीतील व्यक्ती असल्याने या राजकीय नियुक्ती ठरणार असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला 15 ऑगस्टनंतर सुरुवात करण्याचा निर्णय विद्वत परिषदेत घेण्यात आला. याशिवाय पदवी प्रथम आणि द्वितीय वर्ष आणि पदव्युत्तर द्वितीय सत्राचे निकाल सरासरी मूल्यांकनानुसार जाहीर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
यवतमाळ : येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन आहे. त्यासाठी भारतातील विविध ठिकाणची माती आणि जल अयोध्येला रवाना होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या श्रीक्षेत्र रावेरी येथील मातीही अयोध्येला रवाना झाली आहे. त्यामागे विशेष पौराणिक संदर्भ आहे. तो म्हणजे रावेर इथे भारतातील एकमेव सीता मंदिर आहे.
चंद्रपूर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील शैक्षणिक संस्थांना टाळे लागले आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार ऑगस्टपासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियमावली आणि निकष ठरविले जाणार आहे.
#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.