नागपूरसह विदर्भातील गुरुवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal

Sakal 2021-04-28

Views 2.5K

नागपूर : भारतीय रेल्वेने फ्रांसच्या सहकार्यातून मेक इन इंडिया अंतर्गत तब्बल बारा हजार अश्वशक्तीचे इंजिन तयार केले आहे. या महाशक्तिशाली इंजिनसह नुकतीच नागपूर ते आमला दरम्यान पहिली मालगाडी बुधवारी प्रायोगिक तत्वावर चालविण्यात आली. या इंजिनच्या देखभालीसाठी अजनी लोकोशेड सज्ज होत आहे.

नागपूर : नागपुरात खासगी रूग्णालयांकडून होत असलेली रूग्णांची लुट लक्षात घेत महापालिकेनं डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांचं बिलं तपासण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी प्रत्येक खाजगी रूग्णालयात महापालिकेचा कर्मचारी नेमण्यात आलाय. मात्र, याचा विदर्भ हॉस्पीटल असोसिएशननं विरोध केलाय.

नागपूर : व्याघ्र दिन केवळ एक दिवस साजरा होऊन चालणार नाही. एका दिवसावर आपल्याला थांबायचेच नाही, ही वनसंपत्ती आणि जंगलसंपत्ती आपण वाढवली पाहिजे. जगातील काही देश केवळ जंगलसंपत्तीवर देशांचे अर्थचक्र चालवतात. आपल्या वनसंपत्तीचे जतन करायला हवे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्याघ्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वन विभागाने व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'कॉल ऑफ दर महा- टायगर' विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते.

राळेगाव (जि. यवतमाळ) : येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कोदुर्ली (श्रीरामपूर) येथील गजानन भुसेवार यांच्या सख्या तीन मुलींचा घरातील कुलरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज सकाळी आठ वाजता घडली.

मारेगाव (जि. यवतमाळ) : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बुधवारी पहाटे कोविड केअर सेंटरमधून पळून गेला होता. कोविड-19ची बाधा झालेला व्यक्ती गायब झाल्याने प्रशासन खळबडून जागे झाले. तसेच लोकांमध्ये भीती पसरली होती. आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा व्यक्ती तालुक्‍यातील धामणी येथील शेतशिवारात गुरांच्या गोठ्यात दिसला. त्याला ताब्यात घेऊन पुन्हा कोविड केअर सेंटरमध्ये आणण्यात आले. कुटुंबातील सर्वच व्यक्ती विलगीकरणात असल्याने गुरांना चारा टाकण्यासाठी आपण कोविड केअर सेंटरमधून निघून गेलो होतो, असे फरार झालेल्या कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीने पोलिसांना सांगितले.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of ov

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS