कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा एवढेच ध्येय न बाळगता अनेक क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करत मराठा समाजातील गर्भश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय घटकांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका स्वीकारावी. अन्यथा भविष्यात हाताला रोजगार नसलेली पिढी दगड हातात घेऊन व्यवस्थेच्या विरोधात उभी राहील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.