'स्वराज्य' ह्या केवळ एकच विचाराने पेटून उठललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. या दिवशी तमाम शिवभक्त रायगडावर एकत्र येऊन हा शिवराज्याभिषेक सोहळा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करतात.