मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून विजयाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून आपणच नंबर वन असल्याचा दावा सातत्याने केला जात आहे. तर आता राज्यात 3 हजार 276 ग्रामपंचायती मिळवून आपणच नंबर एकचा पक्ष ठरल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपला राज्यात 20 टक्केही ग्रामपंचायती मिळाल्या नसल्याचे पाटील यांनी सांगितले.