वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग)येथील भाजपचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेले म्हणजे राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, असं नाही. अमितभाईंच्या पायगुणाने ते येईलही,असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये केला.शिवसेना संपवण्याची भाषा अमितभाईंनी केली नसल्याचे सांगत पराचा कावळा करण्याची सवय असलेल्या शिवसेना व त्यातही संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे ते म्हणाले.