तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय ही साखळी तुटणार नाही...
सरकारनामा ब्यूरो
नागपूर ः व्यावसायिक लॉकडाऊनच्या विरोधात आहेत, हे खरे आहे. रोजच्या जगण्याचा त्यांचा विचार केला तर त्यांची भूमिका योग्य वाटते. पण परिस्थिती तशी नाहीये. आपले राज्य आता कडक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तुटणार नाही, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले.
काही व्यापाऱ्यांनी सांगितले की तुम्ही काहीही करा, पण सोमवारपासून आम्ही दुकान सुरू करू. पण तसे केल्यास धोका वाढेल. आज झालेल्या बैठकीत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले की तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोनाची ही साखळी तोडता येणार नाही. त्यावर ही साखळी तोडण्यासाठी एकदा काय तो निर्णय आपण घेतला पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
#sarkarnama #nagpur
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics