राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ असलेली वास्तू लक्ष्मीविलास पॅलेस जुन्या शहरापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर स्थित आहे. कसबा बावड्याच्या कागलवाडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात ही वास्तू आहे. वास्तूंच्या रूपाने कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहूंचे कार्य स्थायी, शाश्वत स्वरूपात कायम आहे. या परिसरात कोल्हापूरच्या इतिहासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण शिलालेख, मूर्ती, शिल्पे संग्रहित करून ठेवली आहेत. राजर्षी शाहूंचे कार्य हे भारतापुरते सीमित नसून जगभरात त्यांच्या कार्याची प्रसिद्धी पोहचली आहे. शेती, सिंचन, पाणी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, शैक्षणिक, विकास, कुस्ती, खेळ, संगीत अशी विविध क्षेत्रे त्यांच्या विशेष कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. मागासवर्गीय दुर्बल घटकांचा विकास आणि सर्व धर्माच्या सामाजिक विकासासाठी कोल्हापुरात आणि देशभरात त्यांनी दिलेले योगदान समाजाला मार्गदर्शक ठरणारे असेच आहे.
व्हिडीओ - स्नेहल कदम, जयेश इघारे
#ShahuMaharajPalace #Kolhapur #LakshmivilasPalace #ShahuMaharajBirthPlace #RajarshiShahuMaharajPalace