Godavari river:गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा | Sand Extraction |Marathwada Sakal Media |
गेवराई : तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करुन वाहतूक सुरुच आहे. दरम्यान या अवैधरित्या होणाऱ्या वाळू वाहतुकीविरोधात सोमवारी पहाटे तहसीलदार Tehsildar सचिन खाडे यांनी मोठी कारवाई केली. तब्बल पंधरा हायवासह जवळपास चार कोटीहून अधिक रुपयांचा ऐवज या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी करण्यात आली असून जप्त केलेली वाहने सायंकाळी सहाच्या सुमारास येथील बसस्थानकात लावण्यात आली आहेत. (व्हिडीओ : वैजिनाथ जाधव)
#Godavaririver #sandextraction #Gevrai #Marathwada #Tehsildar