सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात(Pune) घडलीय. बायकोच्या ओढणीचाच फास बनवून या तरुणानं आत्महत्या केलीय. गोखलेनगर(Gokhalenagar) इथल्या सुगम चाळीत राहणाऱ्या 29 वर्षीय निखिल धोत्रेनं(Nikhil Dhotre) रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडलीय. चिठ्ठीत सासरच्या जाचाला कंटाळून तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलंय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी. आई तू काळजी करू नकोस मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे असं या चिठ्ठीत लिहिलंय. निखिलचे वर्षभरापूर्वी लग्नं झालं होतं.
#pune #punesuicidecase #punesuicide #nikhildhotre #nikhildhotresuicide