पुणे ": परळीतील पुजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येमध्ये विदर्भातील एका मंत्र्याचा संबध असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपनकडूनही तसा आरोप केला जात आहे. दरम्यान सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या आत्महत्या प्रकरणाशी संबध असल्याचे चर्चा सुरु आहे. या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबधित मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल.
काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?
या ऑडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ''तरुणीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत आहे'' असे सांगत आहे. यावरुन तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर, ''त्या तरुणीला समजावून सांगा'' असेही तरुणीसोबत असलेला व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिला डॉक्टरकडे घेऊन जा'' असे सांगते. त्यानंतर,''तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार'' असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे. दरम्यान या दोन व्यक्तींमधील बंजारा भाषेतील संवादाचे आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल समोर आले आहे. या ऑडिओ क्लिपवरुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिचा मोबाईल काढून घे'' असे सांगत आहे.
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पुजा चव्हाणच्या आत्महत्येसंबधित असल्याची चर्चा सुरु आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का या तपासणी होईलच. पण तोपर्यंत या 22 वर्षाच्या पुजाने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सत्यता बाहेर आल्यानंतर संबधित मंत्र्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.