चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बिनडोक म्हणणारे भाजप नेते जीवीएल नरसिंहा राव यांच्यावर अभिनेता फरहान अख्तर चांगलाच भडकला आहे. ‘आम्हाला असे बोलण्याची तुमची हिम्मतच कशी झाली?’ असा खणखणीत सवालच फरहानने राव यांना केला आहे.
तामिळ चित्रपट ‘मर्सल’मध्ये जीएसटीवर टीका करणारा सीन असल्यामुळे या चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना जीवीएल नरसिंहा राव यांनी या चित्रपटावर व निर्मात्यांवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर एक वादग्रस्त वक्तव्य केले. ‘आपल्या चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचे सामान्य ज्ञान फारच कमी आहे.’ अशी टीका त्यांनी केली होती.
त्यावर फरहान अख्तरने त्यांना ट्विटरवरून उत्तर दिले. ‘आम्हाला असे बोलण्याची तुमची हिम्मतच कशी झाली? कलाकारांनो बघा हे आपल्याविषयी कसा विचार करतात, असे त्याने ट्विट करत इतर कलाकारांच्याही हा प्रकार निर्दशनास आणून दिला आहे. त्याला त्यान ‘शेम’ हा हॅशटॅगही दिला आहे.