ओ साथी रे....जोडीदार मेल्या वर झाले उंटाने काय केले.. बघा हा विडिओ | Interesting Videos

Lokmat 2021-09-13

Views 153

प्राण्यांनाही माणसा सारख्या भावना असतात..जोडीदार बरोबर असला तर आनंद आणि गेल्यावर दुःखाचे अश्रू ते ही ढाळतात..असेच दृश्य जयपूर मधे पाहायला मिळाला येथे खोनागोरियान परिसरात रोडवर एक अपघात झाला. या अपघातात एका उंटिणीचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या साथीदार उंटाने तिच्या देहाला रोडवर पहारा दिला.आग्रा रोडवरून उंटांची एक जोडी जात होती. यात मादीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेमुळे उंटीण जागीच गतप्राण झाली. हे पाहून दुसरा उंट बेकाबू झाला. तो उंटिणीच्या मृतदेहाजवळ उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. तसेच तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांपासून उंटिणीच्या मृतदेहाचे संरक्षणही करत राहिला. घटनेची माहिती मिळताच खोनागोरियान पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पशुपालन विभागाला माहिती कळवली. उंट काही रस्त्यावरून हटला नाही, उलट पोलिसांनाच ट्रॅफिक वळवावी लागली आणि लोकांना घटनास्थळापासून दूर न्यावे लागले काही वेळाने पोलिसांनी उंटिणीचा मृतदेह क्रेनच्या मदतीने गाडीतून पाठवला, त्यानंतर हा उंट तेथून हलला...प्रेमाचे हे रूप पाहून लोकांचे डोळे ओले झाले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS