ओम भग भुगे भग्नी भागोदरी, ओम फट स्वाहा... महाराष्ट्रातील सिनेरसिकांना तोंडपाठ झालेला हा मंत्र पुन्हा एकदा घुमणार आहे. कारण, या मंत्रोच्चारानं सिनेरसिकांना झपाटून टाकणारा तात्या विंचू पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. 'झपाटलेला 3' या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी स्वत: मुंबईतील एका कार्यक्रमात नुकतीच 'झपाटलेला ३'ची घोषणा केली. 'झपाटलेला' चित्रपटाची लोकांमध्ये अजूनही प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळंच मी 'झपाटलेला 3' करायचं ठरवलंय,' असं त्यांनी सांगितलं. काही महिन्यांपूर्वी कोठारे यांनी ट्विटरवर तात्या विंचूचा फोटो टाकत चाहत्यांना याचे संकेत दिले होते. त्यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं होतं. तात्या विंचू, कुबड्या खवीस आणि बाबा चमत्कारच्या गोष्टी पुन्हा ऐकू येऊ लागल्या होत्या. महेश कोठारे यांच्या ट्विटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आम्हीही तात्या विंचू परत येण्याची आतुरतेनं वाट पाहतोय, असं लोकांनी म्हटलं होतं. त्याची दखल घेऊन कोठारेंनी 'झपाटलेला ३'ची अधिकृत घोषणा केलीय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews