हैदराबादच्या मेधा सर्व्हो ड्राइव्ह’ या कंपनीने तयार केलेल्या देशी बनावटीच्या लोकलचे आगमन नुकतेच मुंबईत झाले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेवर ही ‘मेधा’ लोकल चालविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. चाचणीनंतरच ही लोकल ट्रान्स हार्बरवर चालवायची की मेन लाइनवर याबाबतची घोषणा करण्यात येईल.मध्य रेल्वे अशी अक्षरे रंगविलेल्या आकर्षक ‘मेधा’ लोकलचा नवा कोरा रेक चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून दाखल झाला आहे. अशा आणखी चार ‘मेधा’ लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत. तसेच बम्बार्डिअर कंपनीने तयार केलेल्या २० लोकल अशा २४ लोकल मध्य रेल्वेला टप्प्याटप्प्याने मिळणार आहे ह्या मेधा ची अंतर्गत विद्युत यंत्रणा आणि मोटर्स हैदराबादच्या मेधा सर्व्हो ड्राइव्ह कंपनीने तयार केली आहे
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews