देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २०१५-१६ मध्ये ८ टक्के होते. त्यात ०.९ टक्क्यांची घसरण होऊन २०१६-१७ मध्ये जीडीपी ७.१ टक्यांपर्यंत खाली घसरल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभे त सांगितले. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थे तील मंदीमागे विविध कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने जागतिक अर्थव्यवस्थेतील घसरण, जीडीपीच्या तुलनेत कमी झालेली फिक्स्ड गुंतवणूक, उद्योग क्षेत्रात कमी झालेली पतवाढ, कॉर्पोरेट क्षेत्रातील घसरण याचा परिणाम देशाच्या जीडीपीवर झाल्याचे जेटली यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०१६ मध्ये जगात झपाट्य़ा ने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून हिंदुस्थानला पाहिला क्रमांक दिला होता. २०१७ मध्ये हिंदुस्थानचा हा क्रमांक दोनपर्यंत खाली आला आहे, मात्र २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्थेला वेग येईल. जीएसटी अंमलबजावणी मुळेही व्यापारउद्योग वाढीला चालना मिळेल असे जेटली म्हणाले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews