डेनमार्कमधील कोपनहेगन इथे कॅफे-३३ नावाचं प्रसिद्ध कॅफे आहे, जिथे सव्वा आठ लाख रूपयांची रशियन व्होडका ठेवण्यात आली होती. ही व्होडकाची बाटली एका चोराने चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.कॅफे-३३ च्या मालकाने व्होडकाची ही बाटली उधारीवर आणली होती, उधारीचा माल चोरीला गेल्याने करायचं काय या चिंतेत तो पडला आहे. इंगबर्ग असं या कॅफेच्या मालकाचं नाव असून त्याने सांगितलंय की ही बाटली त्याने चारचाकी गाड्यांचं उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून घेतली होती. आलिशान गाड्यांची निर्मिती करणारी रशियाची कंपनी रुसो बाल्टीक या कंपनीला १०० वर्ष झाल्याबद्दल ही बाटली खास तयार करण्यात आली होती. ज्यासाठी सोनं-चांदी आणि हिऱ्याचा वापर करण्यात आला आहे. या बाटलीचं वजन ३ किलो असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews