बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोण तिच्या वाढदिवशीच बॉयफ्रेण्ड रणवीर सिंह सोबत साखरपुडा करणार असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र तसं काहीच झालं नाही. दीपिका आणि रणवीरने त्यांच्यामध्ये असलेल्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी विविध कारणां मुळे मात्र त्याचं रिलेशन हे नेहमीच चर्चेत असतं. रणवीरच्या पालकांनी दीपिकाला एक सुंदर महागडा डायमंड सेट आणि उंची साडी भेट म्हणून दिली आहे. यामुळे दीपिका खूपच खूश झाली आहे. रणवीरच्या आईवडिलांनी दीपिकाला अशाप्रकारचं खास गिफ्ट दिल्यामुळे आता या दोघांचं लग्न नेमकं कधी होणार याकडेच चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews