लितानी गावचा रहिवासी असलेला २५ वर्षीय सुरेंद्र त्याच्या कारने दोन मित्रांसह प्रवास करत होता. त्याचवेळी अचानक एक वन्य प्राणी गाडीसमोर आल्यामुळे त्याला वाचवायच्या नादात चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी त्यांना तातडीने मदत केली आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews