पारनेर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ राळेगणसिद्धी व परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी पारनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तर राळेगणसिद्धीत तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मंजूर होत नाही, तोपर्यंत टाकीवरुन खाली न उतरण्याचा इशारा तरुणांनी दिला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews