चूक नसताना देखील आपली दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून नेल्याचा निषेध करण्यासाठी कोथरूड परिसरातील सचिन धनकुडे यांनी भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या देखाव्यामध्ये चक्क गाडीचं स्मारक उभारलं आहे. या स्मारकावर त्यांनी पुणेरी पाट्यांच्या स्टाईलमध्ये वेगवेगळे संदेश देखील लिहिले आहेत. पुण्यात सध्या हे स्मारक चर्चेचा विषय ठरत आहे!
#pune #decoration #ganpati2021