भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे विरोधी पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता प्रविण दरेकरांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. किरीट सोमय्यांवर केलेली कारवाई ही लोकशाहीला शोभणारी नाही, असं म्हणत दरेकरांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.