राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर परखड टीका केली आहे.