वाशिम - मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातील पाणी मंगरुळपीर शहरातील नागरिकांसाठी मोतसावंगा प्रकल्पात वळविण्याची योजना मंजूर झाली आहे. या योजनेला सोनल प्रकल्पावर अवलंबून असलेल्या परिसरातील २० ते २२ गावातील ग्रामस्थ आणि शेतकºयांनी कडाडून विरोध करीत, २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सोनल प्रकल्पातील पाणी अन्यत्र वळविण्यात येऊ नये, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व सोनल प्रकल्प शेती सिंचन बचाव समितीने केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews