केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या धोरणांवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने आधीच नियोजन करून लसी विकत घेतल्या असत्या तर लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी इतका कालावधी लागला असता असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोवरही आक्षेप नोंदवला आहे.