केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल-डिझेल नाही तर भविष्यात ग्रीन हायड्रोजनवर गाड्या धावणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या सहाव्या राष्ट्रीय आर्थिक समावेशन कार्यक्रमात ते बोलत होते. हे ग्रीन हायड्रोजन सांडपाण्यापासून तयार करण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले. शिवाय लोकांना विश्वास वाटावा यासाठी मी स्वतः ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी चालवणार असल्याचं देखील गडकरी म्हणाले.
#NitinGadkari #RoadTransport #GreenHydrogen #Wastewater