VIDEO | सरकारने दारू स्वस्त केली आणि प्यायला पाणी नाही | गिरीश महाजन

TimesInternet 2021-12-20

Views 7

#बोदवड येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत माजी मंत्री गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर जोरदार टीका केलीये.महाराष्ट्रात सध्या नगर पंचायत निवडणुकीचं वारंसुरु आहे."मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत अन् स्वतःच्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास आणि म्हणे मोठा नेता" असे म्हणत गिरीश महाजन यांनी नगरपंचायत निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचार सभेत खडसेंवर टीका केली. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत आहे.प्रचाराचा शेवटच्या दिवशी भाजपतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दहा उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आलं होत.एकीकडे भाजपतर्फे गिरीश महाजन यांची प्रचारसभा तर, याच ठिकाणाहून ५०० मीटरच्य़ा अंतरावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खडसेंची प्रचार सभा होती.एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण तापले

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS