#ChristmasCelebration #NewYeatParty #OmicroneVariant #MaharashtraTimes
ख्रिसमसचं सेलिब्रेशन किंवा ईयर एन्डची पार्टी करायचा प्लॅन आखला असेल, तर जरा जपूनच. कारण, देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चाललाय. त्यामुळेच पुन्हा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता दिसतीय. दिल्ली सरकारने मोठं पाऊल उचलत नाताळ सेलिब्रेशन आणि न्यू ईयर पार्टीसह सर्वच कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातलीय. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबतचा आदेश जारी केलाय. दुसरीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडूनही सेलिब्रेशन्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत.