भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यात करोना आढावा बैठकीत बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.
##KiritSomaiya #ajitpawar #PMC #bjp #shivsena #JumboCovidHospital