आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आमरण उपोषण सुरू झाले आहे. यावेळी त्यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती या देखील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसले आहेत ही वेळ यायला हवी नव्हती परंतू, सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे ही वेळ राजेंवर आली आहे. मी स्वतः शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.