योगी आदित्यनाथ यांचा आज संध्याकाळी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी योगींसोबत ४७ मंत्रीही शपथ घेणार असल्याची माहिती मिळतेय. या शपथ ग्रहण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. आजच्या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी कालच अमित शाह लखनऊत दाखल झालेत. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा होणार आहे. त्यामुळे या परिसरात शपथविधी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्टेडियम परिसरात योगी आदित्यनाथांचे मोठमोठे पोस्टर लागलेत. योगी आदित्यनाथ यांनी स्वत: फोन करुन मुलायम सिंह, अखिलेश यादव आणि मायावती निमंत्रण दिलंय.