गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री विठ्ठलाचा आणि श्री रुक्मिणीमातेचा गाभारा तसेच मंदिराच्या अन्य भागात फुलांनी आणि फळांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या फळाफुलांच्या मध्ये उभी राहिलेल्या विठूमाऊलीचे आणि रुखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. (टाळगाव ) चिखली येथील श्री विठ्ठल भक्त नाना बबन मोरे आणि नवनाथ नामदेव मोरे यांनी सजावटीसाठी फुले उपलब्ध करुन दिली आहेत. याशिवाय आजपासून भाविकांना थेट विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणावर माथा टेकून दर्शन घेता येणार आहे.
#GudiPadwa #VitthalRakhumai #GudiPadwainMarathi #GudiPadwaImages #GudiPadwaVideos #GudiPadwaPoojainMarathi #GudiPadwaStatus #esakal #SakalMediaGroup