सांगली ः दोन वर्षानंतर आज अंगारकी संकष्टी मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली. सांगलीचे ग्राम दैवत असणाऱ्या गणरायाला सांगलीकरांनी वंदन केले. संस्थानच्या गणेश मंदिरासह शहरातील विविध गणेश मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रिघ लागली होती.
कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांपासून उत्सवासह सार्वजनिक कार्यक्रम बंद होते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दोन वर्षानंतर आज पहिली अंगारकी संकष्टी मोठ्या उत्साहान आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली. संस्थानच्या गणेश मंदिरात मारूती अक्कीमडी यांनी आकर्षक सजावट केली होती. मंदिरात मुख्य पुजारी रमेश पाटणकर यांनी विधीवत पद्धतीने पुजा केली. त्यानंतर भक्तांची मोठी रिघ दर्शनासाठी लागली होती. तसेस विश्रामबाग परिसरातील गणेश मंदिरातही मोठी गर्दी होती.
दरम्यान, उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सर्वच पदार्थ सरासरी दहा टक्क्यांनी वाढले होते. सकाळपासून सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून आले.
#sangali, #sangalinews, #angarakichaturthi, #chaturthi, #ganpatibappa, #ganpatibappamoraya,