दंगलग्रस्त जहाँगीरपुरीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, अतिक्रमण हटाव मोहीम सुरु
दिल्लीतील दंगलग्रस्त जहाँगीरपुरी परिसरात दिल्ली महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. या मोहिमेसाठी जवळपास हजार-दीड हजार पोलीस आणि सुरक्षा दलाचे कर्मचारी जहाँगीरपुरी परिसरात तैनात करण्यात आलेत. त्यामुळे आता दिल्ली महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दंगलग्रस्त भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येतेय. त्यासाठी बुलडोझर या परिसरात दाखल होताच स्थानिकांकडून याला विरोध करण्यात येतोय. तरी, इथे अतिक्रमण हटावची कारवाई सुरुच आहे.
#JahangirpuriViolence #Delhi #JahangirpuriNews #Sakal #DelhiRiots #Riots #BajrangDal #JamaMasjid