Raj Thackeray | पुण्यात २१ मे रोजी राज ठाकरे यांची सभा| Sakal Media
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा येत्या २१ मे रोजी पुण्यातील डेक्कन जवळील नदी पात्रात होणार आहे. मागच्या तीन सभेत राज ठाकरेंनी मशिदी वरच्या भोंग्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन देखील केलं या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
आजपासून राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत .21 मे रोजी होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.