सोशल मीडियावर खोटे बोलणे आणि प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर दिल्ली पोलीस आता कडक कारवाई करत आहेत. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना कथित प्रक्षोभक वक्तव्य करणे महागात पडले आहे. ओवेसींच्या या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांच्या IFSO टीमने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. एफआयआरमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांचेही नाव आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावरही कारवाई केली आहे.