मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.